तिची आणि
माझी ओळख तशी
दीड वर्षभरापूर्वीची....एका
कॉमन मित्रामुळे आमची
ओळख झाली.तिला
पाहताच क्षणी ती माझी
होऊन गेली.हि
'ती' दुसरी तिसरी
कुणी नसून ती
आहे माझ्या मित्राचा
घराची 'गच्ची'.खरंतर लहानपणापासून
मी वन रूम
किचन एवढ्याशा घरात
राहिले, वाढले असल्यामुळे मला
कायम गच्ची किंवा
बाल्कनी या प्रकाराचं
विशेष आकर्षण होतं.मला कायम
वाटायचं दोन खोल्यांचं
घर असलं तरी
चालेल पण घराला
मोठी मोकळी गच्ची
असावी.त्या गच्चीवर
खूप सारी झाडं
असावीत, झाडांना रोज रंगीबेरंगी
फुलं यावीत.वर
पाहावं तर चंद्र
आपल्या गच्चीतच पाहतोय असं
वाटावं.रात्री गच्चीत आरामखुर्ची
टाकून मस्त जुनी
हिंदी गाणी ऐकावीत.जणू काही
आकाशातून रफी ,किशोर
यांनी माझ्या गच्चीतच
अवतराव.तिथेच बसून झाडांशी
गप्पा माराव्या.आणि
भांडणं झाली तर
झाडांशी कट्टी घेऊन वरचा
निळाशार आभाळाशी बोलावं......पण
इतका सगळं करायला
मुंबईत तशी गच्ची
मला काही सापडली
नाही जिला पाहताच
क्षणी आपलं व्हावं.पण साधारण
दीड वर्षापूर्वी पुण्यात
एका मित्राचा घरी
जाणं झालं आणि
ती भेटली.त्याने
घराचं दार उघडून
आत यायला सांगितलं,मी दार
लोटून घेतलं आणि
उजवीकडे पाहिलं तर
छान झाडा-फुलांनी
भरलेली गच्ची दिसली.आपसूकच
पाय पहिले गच्चीकडे
गेले.कधी कधी
असं होतं कि
एखाद्याला आपण आपल्या
पहिल्या भेटीतच ओळखतो,कळून
जातं कि याचं
आणि माझं जमेल.तसं काहीसं
तेव्हा मला त्या
गच्चीबद्दल वाटलं.पहिल्या भेटीतच
ती माझी होऊन
गेली.काही ठिकाणं,काही माणसे
अशी असतात कि
आपल्याला तिथे त्या
जागेसाठी,त्या माणसांसाठी
थांबायच असतं.मला
त्या गच्चीवर गेल्यावर
तिथेच थांबून राहावं
कायम असं वाटत
होतं.तसं मी
लगेच माझ्या मित्राला
म्हणाले देखील कि फक्त
गच्ची विक मला
(पूर्ण घर विकत
घेणं सध्यातरी परवडणार
नाही..हाहाहा )..पण
त्याने ते फार
मजेत घेतलं.पण
खरंच काही जागांवर
निर्जीव असून देखील
जीव लावासा वाटतो.गच्चीवर गादी टाकून
वर आकाशाकडे पाहत
झोपण्यात कित्ती मज्जा येईल ना.पण खरी
धमाल तर पावसात
येते तिथे.असं
वाटत कि पावसाच्या
सरी आपल्यावर बरसण्यासाठीच
आपल्या गच्चीत ढगांना घेऊन
आल्या आहेत. आपल्याला
अनेक मित्र मैत्रिणी
असले तरी प्रत्येक
मित्रा बरोबरचं, मैत्रिणी बरोबरचं नातं हे
फार वेगळं असतं.त्या मित्राची
किंवा मैत्रिणीची जागा
इतर कुणी घेऊ
शकत नाही.तसंच
मला जागांच वाटतं.त्या गच्चीची रिप्लेसमेंट
इतर कोणतीही जागा
घेऊ शकत नाही.या
गच्चीचं आणि माझं
एक वेगळंच नातं
आहे.तिथे मिळणारी
शांतता, तिथे मला
सापडणार माझं अस्तित्व
हे इतर कुठेही
मिळणार नाही.जणू
काही ती गच्ची
मला माझंच आतलं
रूप दाखवत असते.असं वाटतं
कि वाऱ्याबरोबर झुलत
राहावं, आकाशाचा निळ्याशार रंगात स्वतःला
शोधावं,जे काही
आहे मनात ते
सगळं काही गच्चीला
सांगून मोकळं व्हावं.आणि
गच्चीनेही शान्तपणे सगळ ऐकून
आपल्यालाला कवेत घ्यावं.तिथून निघताना कायम
वाटतं कि माझं
असं काहीतरी मी
इथे सोडून जातेय
आणि त्यामुळेच पुन्हा
येण्याची ओढ सतत
मनात असते.मागे
H . Masud Taj यांच एक
आर्टिकल वाचलेलं त्यात त्यांनी
म्हटलेलं कि When you lean out of balcony,
you wish to go beyond. When lean out, the balcony is dreaming you. Because
where balconies end, a soaring begins that no parapet can curtail…Some
balconies are like words left hanging in the air :)
Saturday, December 12, 2015
Sunday, August 23, 2015
कुछ अनकहासा
बात लब्झोतक आयी थी..बतानाही था पर पता नही क्यू लब्झोनेही मुह मोड लिया.
कुछ तो था उन लब्झोमे जो रोक रहा था मुझे..
एहसास था वो अलगही उन लब्झोका जो अबतक कभी मेहसूसही नही किया..
गेहारायी थी उनमे जो कभी देखीही नही थी ..
पता नही क्यू पर कई जगह लब्झोने रोका..
पुछे कई सवाल जो अबतक मेने ना खुदको पुछे.
पर सवालोके जवाबोमे कई लब्झ मिले..एक दुसरेसे..
कुछ तो बता रहे थे मुझे जैसे कि सालोबाद मिले...
जैसे कि में सिर्फ कासीद थी उन लब्झोकी
जैसे कि में देख रही थी उन्हे..मेहसूस कर रही थी..सुन रही थी..
सोचा कि बाहोमे लेलू उन्हे ,थाम लु उनका हाथ और चल पढू उनके साथ
पर जाना था उन्हे एक अलगही रास्तेपे ..
वो चले गये मुझे एक नया एहसास देके और फिर जन्म हुवा अनकहे लब्झोका..
Sunday, May 17, 2015
मी आणि वारा कि मी आणि वेळ?
डोळे गच्च बंद करून फक्त या वाऱ्याचा आवाज ऐकावासा वाटतोय ,वाऱ्याचा स्पर्श पूर्ण देहाला नवीन स्वरूप देतोय.असं वाटतंय कि बास, आता काहीच नको आयुष्याकडून ...फक्त मी आणि हा वारा..आणि हा वारा जिथे जाईल तिथे त्याचाबरोबर वाहत सुटावं.कुठे थांबूच नये. कुठल्याही कारणासाठी नाही आणि कुठल्याही वेळेसाठी नाही..कारण जर थांबले तर थांबलेल्या त्या वेळेला मला किंमत द्यावी लागेल. आणि ती वेळ कशी असेल ते माहित नाही.आज चांगली तर उद्या वाईट. वेळेचा काही भरोसा नाही .वाऱ्याच तसं नाही.तो सतत फिरतच असतो. दिशा कोणतीही असली तरी वाहता येतं.रोखणार कुणीही नसतं.खरं पाहता वाऱ्यासारखा जगणं सोप्पं आहे.दिशाहीन फिरण्यात देखील गम्मत असलेच कि नाही.मुळात दिशाहीन असं काही नसतंच माझा मते.आपल्यासाठी चुकलेल्या दिशेला आपण दिशाहीन म्हणून मोकळे होतो. किती conveniently आपण ठरवतो कि कशाला किती महत्व द्यायचं आणि कशाची काय व्याख्या करायची ते.आपल्या विचारांची पण गम्मत असते .कधी कधी आपण आज उद्याचा इतका विचार करतो कि 'आत्ताचा' विचार राहूनच जातो कि. माझंही काहीसं तसंच होतंय.आत्ता वारा म्हणतोय कि चल बघू माझाबरोबर.छान हवं तितकं फिर. निवांत! कशाचीही फिकीर न करता , कुठल्याही बंधनांचा विचार न करता,'उद्या हे करायचं आणि परवा ते' या सगळ्या विचारांना मागे सोडून....चल!पण वेळ थांबवतेय.तिचं म्हणणं आहे कि वारा हा असाच फिरत राहणार,कुणास ठाऊक उद्या हा वारा तुझाबरोबर असेलच का? तो जाईलच कि त्याचा दिशेने.आणि हे असं तू किती वेळ फिरणार?कधीतरी कुठेतरी थांबावं लागेलच ना?मग तेव्हाचा वेळेला काय उत्तर देणार? त्यापेक्षा आत्ता थांब , मी बदलेन.आज वाईट वेळ जरी चालू असली तरी उद्या मात्र नक्कीच चांगली वेळ येईल. थांब इथे आणि धैर्याने वाईट वेळेला सामोरं जा, वाऱ्याबरोबर अशी पळू नकोस.
पण वाऱ्याचा हा मुक्तपणा, हा स्पर्श मोहात पाडतोय मला सगळं काही विसरून वाहायला.पण वेळ ,तिचं काय? वारा फक्त आत्ताचा क्षण देतोय मला असं मोकाट जगायला,उद्या तोही वेळेसमोर झुकला तर?उद्या कदाचित वेळ असेलही माझाकडे पण वारा नसला तर? ..मला दोन्ही हवंय..वाऱ्याबरोबर वाहणं पण आणि स्वतःला रोखू शकेल अशी वेळ पण.हा ना माझ्यासारख्या कन्या राशी वाल्या लोकांचा गोंधळच असतो नेहमी.दोन गोष्टींमधली एक गोष्ट काही निवडता येत नाही.पण मी वाऱ्याला सांगितलंय जरी मी आत्ता तुझाबरोबर वाहू शकले नाही तरी हा वाहण्याचा गुणधर्म नक्की मला देऊन जा,निदान 'मी देखील कधीही वाहू शकते' हे 'वाईट वेळेला' सांगून blackmail तरी करता येईल .
Subscribe to:
Posts (Atom)