Sunday, August 23, 2015

कुछ अनकहासा

बात लब्झोतक आयी थी..बतानाही था पर पता नही क्यू लब्झोनेही मुह मोड लिया.
कुछ तो था उन लब्झोमे जो रोक रहा था मुझे..
एहसास था वो अलगही उन लब्झोका जो अबतक कभी मेहसूसही नही किया..
गेहारायी थी उनमे जो कभी देखीही नही थी ..
पता नही क्यू पर कई  जगह  लब्झोने रोका..
पुछे कई सवाल जो अबतक मेने ना खुदको पुछे.
पर सवालोके जवाबोमे कई लब्झ मिले..एक दुसरेसे..
कुछ तो बता रहे थे मुझे  जैसे  कि सालोबाद मिले...
जैसे कि में सिर्फ कासीद थी उन लब्झोकी
जैसे कि में देख रही थी उन्हे..मेहसूस कर रही थी..सुन रही थी..
सोचा कि बाहोमे लेलू उन्हे ,थाम लु उनका हाथ और चल पढू उनके साथ
पर जाना था उन्हे एक अलगही रास्तेपे ..
वो चले गये मुझे एक नया एहसास देके और फिर जन्म हुवा अनकहे लब्झोका..

Sunday, May 17, 2015

मी आणि वारा कि मी आणि वेळ?

डोळे गच्च बंद करून फक्त या वाऱ्याचा आवाज ऐकावासा वाटतोय ,वाऱ्याचा स्पर्श पूर्ण देहाला नवीन स्वरूप देतोय.असं वाटतंय कि बास, आता काहीच नको आयुष्याकडून ...फक्त मी आणि हा वारा..आणि हा वारा जिथे जाईल तिथे त्याचाबरोबर वाहत सुटावं.कुठे थांबूच नये. कुठल्याही कारणासाठी नाही आणि कुठल्याही वेळेसाठी नाही..कारण जर थांबले तर थांबलेल्या त्या वेळेला मला किंमत द्यावी लागेल. आणि ती वेळ कशी असेल ते माहित नाही.आज चांगली तर उद्या वाईट. वेळेचा काही भरोसा नाही .वाऱ्याच तसं नाही.तो सतत फिरतच असतो.  दिशा कोणतीही असली तरी वाहता येतं.रोखणार कुणीही नसतं.खरं पाहता वाऱ्यासारखा जगणं सोप्पं आहे.दिशाहीन फिरण्यात देखील गम्मत असलेच कि नाही.मुळात दिशाहीन असं काही नसतंच माझा मते.आपल्यासाठी चुकलेल्या दिशेला आपण दिशाहीन म्हणून मोकळे होतो. किती conveniently आपण ठरवतो कि कशाला किती महत्व द्यायचं आणि कशाची काय व्याख्या करायची ते.आपल्या विचारांची पण गम्मत असते .कधी कधी आपण आज उद्याचा इतका विचार करतो कि 'आत्ताचा' विचार राहूनच जातो कि. माझंही काहीसं तसंच होतंय.आत्ता वारा म्हणतोय कि  चल बघू माझाबरोबर.छान हवं तितकं फिर. निवांत! कशाचीही फिकीर करता , कुठल्याही बंधनांचा विचार करता,'उद्या हे करायचं आणि परवा ते' या सगळ्या विचारांना मागे सोडून....चल!पण वेळ थांबवतेय.तिचं म्हणणं आहे कि वारा हा असाच फिरत राहणार,कुणास ठाऊक उद्या हा वारा तुझाबरोबर असेलच का? तो जाईलच कि त्याचा दिशेने.आणि हे असं तू किती वेळ फिरणार?कधीतरी कुठेतरी थांबावं लागेलच ना?मग तेव्हाचा वेळेला काय उत्तर देणार? त्यापेक्षा आत्ता थांब , मी बदलेन.आज वाईट वेळ जरी चालू असली तरी उद्या मात्र नक्कीच चांगली वेळ येईल. थांब इथे आणि धैर्याने वाईट वेळेला सामोरं जा, वाऱ्याबरोबर अशी पळू नकोस.
पण वाऱ्याचा हा मुक्तपणा, हा स्पर्श मोहात पाडतोय मला सगळं काही विसरून वाहायला.पण वेळ ,तिचं काय? वारा फक्त आत्ताचा क्षण देतोय मला असं मोकाट जगायला,उद्या तोही वेळेसमोर झुकला तर?उद्या कदाचित वेळ असेलही माझाकडे पण वारा नसला तर? ..मला दोन्ही हवंय..वाऱ्याबरोबर वाहणं पण आणि स्वतःला रोखू शकेल अशी वेळ पण.हा ना माझ्यासारख्या कन्या राशी वाल्या लोकांचा गोंधळच असतो नेहमी.दोन गोष्टींमधली एक गोष्ट काही निवडता येत नाही.पण मी वाऱ्याला सांगितलंय जरी मी आत्ता  तुझाबरोबर वाहू शकले नाही तरी हा वाहण्याचा गुणधर्म नक्की मला देऊन जा,निदान 'मी देखील कधीही वाहू शकते' हे 'वाईट वेळेला' सांगून blackmail तरी करता येईल .

Friday, October 10, 2014

मला भेटलेली ती

ऑफिसची कामे , वर्क प्रेशर , मिटींग्स याचा अत्यंत कंटाळा आलेला .दिवसरात्र डोक्यात ऑफिस आणि फ्युचर हेच चालू असतं. स्वतःची  Ca ची practice सुरु करायचीय तीही पुढचा दोन वर्षात...कसा काय जमून येणारय हेच सतत डोक्यात चालू असतं .त्यातून आईबाबांनी आणि निखिल चा आईबाबांनी २०१६ साल निश्चित केलय आमचा लग्नासाठी .तशी निखिल ला घाई नाही लग्नाची पण आता २०१४ चालूय आणि पुढल्या दोन वर्षात लग्नाआधी मला माझं ऑफिस सुरु करायचंय.सगळा गोंधळच आहे नुसता मनात.या सगळ्यातून जरा ब्रेक मिळावा म्हणून निखिलनेच सुचवला कि गावी जावून ये कोकणात ४ दिवसासाठी  ..बरं वाटेल छान पावसाळी वातावरण आहे तर फ्रेश होशील....कोकण दर्शनाची सुरवात खास प्रवासापासूनच सुरु करावी म्हणून रात्रीचा प्रवास ऐवजी दिवसाचा प्रवास निवडला. आणि सकाळचा ट्रेनची तात्काळ मध्ये तिकीट काढून मोकळी झाले.
सकाळी सकाळी स्टेशनवर मस्त वाफाळता चहा घेऊन दादर- सावंतवाडी अशा प्रवासाला सुरवात केली.नशिबाने माझी विंडो सीट होती. विंडो सीट आणि जरा बरे सहप्रवाशी इतकी काय ती माझी माफक अपेक्षा असते कोणत्याही प्रवासाकडून.मग काय....मला नाही बुवा जमत प्रवासात पुस्तक वाचायला नाहीतर ढिम्मपणे बसायला.प्रवासात कसा चार नवीन प्रवासी भेटतात त्यांचाशी बोलावं, चार गोष्टी जाणून घ्याव्या.गप्पिष्ट असा माझा स्वभाव प्रवासात देखील शांत होत नाही.माझा समोरची विंडो सीट खरतर रिकामी होती पण बाकीचा चारही जागांवर सत्तरीतले आजी आजोबा बसलेले होते..खरतर माझा आजी आजोबा ग्रुप बरोबर पण जमत पण हे चौघे मात्र 'चायमे पानी जादा आणि शक्कर कम है फिरभी कैसा १० रुपया चाय का ' अशा चहावाल्याकडे सकाळी सकाळी कटकट करणाऱ्या कॅटेगरीतले होते.मनातल्या मनात म्हटला हा प्रवास अगदीच किरकिऱ्या लोकांबरोबर होणार असा दिसतंय एकूणच.पण तरी निदान समोरचा सीट वर जरा देखणा  मुलगा आला तर बरं होईल...म्हणजे निखिल तसा देखणाच आहे आणि लग्न पण फिक्स आहे आमचं पण तितकंच जरा नेत्रसुख प्रवासभर ;) पुढचं स्टेशन म्हणता म्हणता आलं पण आणि माझी  नजर  इकडे तिकडे पाहत होती कि नक्की कोण समोर येवून बसतंय..तितक्यात एक मुलगी सीट शोधत आली आणि समोरचा सीटवर येवून बसली .ट्रेकला नेतात तशी sack होती पाठीला .ती पाहूनच मनात म्हटलं नक्कीच गोव्याला फिरायला चालली असणार ही.साधारण माझाच वयाची दिसत होती चोव्वीस पंचविशीची...लूज टी शर्ट आणि खाली पायजमा ,गळ्यात कलरफुल स्ट्रोल, हातात मोठ्ठ घड्याळ आणि पायात शूज ...थोडी विचित्र वाटावी अशी fashion होती खरी पण एकूण personality  मात्र स्मार्ट होती. sack सीट खाली टाकून ती माझा समोर बसली...तितक्यात एक चहावाला आला.त्याचाकडून गरम गरम चहा घेऊन खिडकीबाहेर टक लावून पाहत  बसली.असं वाटत होता काहीतरी स्वप्न पाहतेय उघड्या डोळ्यांनी...डोळ्यात कमालीचा आत्मविश्वास दिसत होता..हुशार आणि कमालीची उत्साही अशी वाटत होती ती एकूणच मला.मी तिचाकडे पाहतेय हे तिचा लक्षात आल्यावर मी लगेच दुसरीकडे पाहायला लागले तर स्वताहून तिने shake hand करायला हात पुढे केला आणि म्हणाली '' Hi ! I am Anushka  Iyyer " मीही लगेच हात पुढे करून म्हंटलं "Hi ! I am अश्विनी रेडकर "ती लगेचच म्हणाली "रेडकर? वॉव, मराठी ,मस्तच !" मस्त'च' शब्द ऐकून आश्चर्याने विचारला तिला "मराठी येतं?""हो , अर्थातच, मुंबईत राहायचा म्हणजे मराठी आलंच पाहिजे ना आणि मी theater चा खूप अभ्यास केलाय सो अनेक मराठी नाटकं पाहिलीयेत ,वाचलीयेत त्यामुळे जमतं बर्यापैकी मराठी बोलायला "खूप उत्साहाने ती म्हणाली.मी मनात म्हटलं बरंय नाहीतर प्रवासभर 'ohh yeah , why  not ' असे इंग्रजी शब्द वापरावे लागले असते.ऑफिस मध्ये पण तेच असतं सतत तोंडात साखरे एवढं गोड इंग्लिश....मी लगेच विषय वाढवण्यासाठी म्हटलं "कमालच आहे तुझी,मराठी नाटकांचा अभ्यास वैगेरे तेही south Indian असताना देखील ?""Tamilian , I am Tamilian "मला लगेच वाटला तेच ना म्हणजे ..पण मग म्हटलं जाऊ दे.असतो एकेकाला मातृभाषेचा अभिमान...खरतर मीच आधी विचारायला हवं  होतं कि Iyyer म्हणजे नेमके कोण..पण माझं अज्ञान काय वाचणार तिचासमोर..मग तिनेच विचारला कि तू काय करतेस? मी सांगितल अमुक अमुक कंपनी मध्ये Ca आहे. Ca म्हटल्यावर तिचा थोडा चेहरा पडला ..मला कळेचना काय झालं म्हणून मी तिला विचारल "anything  wrong ?" तर ती म्हणाली " नाही , actually acoounts वैगेरे फार बोरिंग वाटतं मला" मी लगेच म्हटलं " तसं ते दिसतं फक्त ,पण मजा आहे त्यात पण....खरतर मलाही नाटक पाहायला फार आवडत, लहानपणी मी बालनाट्यात कामं पण केलीत "तिला एकदम कौतुक वाटला आणि आमचा गप्पा सुरु झाल्या.नाटक हा दोघींचाही जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे मला जाणवला कि हा प्रवास विचारांनी सुखमय होणार हे नक्की. तमिळ असून पण सखाराम बाईंडर , अश्रूंची झाली फुले, ती फुलराणी अशी अनेक नाटकं तिने पहिली होती ,ती मराठी नाटकांबद्दल भरभरून बोलत होती....मग आमचे विषय मराठी संस्कृती,खाद्यापादार्थांवर गेले...इतपत कि अगदी तिने पुरणपोळी ची recipe तिचा tab मध्ये लिहून घेतली...बाहेर दिसणारा हिरवागार निसर्ग आमचा प्रवास अजूनच  सुंदर करत होता.खूप वर्षांनी एखादी मैत्रीण भेटावी असं वाटत होतं मला. मधेच पावसाची एखादी सर guest appearance देऊन जात होती.या सगळ्या गप्पांचा नादात मी विचारायलाच विसरले कि पोटापाण्यासाठी काय करते ही नेमकी?मी विचारल्यावर हसायला लागली आणि म्हणाली "आत्ता काय करते ते सांगू कि आधी काय करायचे ते कि पुढे काय करणार ते?"मला काही कळलंच नाही ..या तिन्ही काळात तिचं कामं कसं काय बदलू शकतं? माझा चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून ती स्वतःच म्हणाली "मी एक Travel show direct करतेय सध्या" मला ऐकून फारच interesting वाटलं, मी लगेचच तिला त्याबद्दल details विचारले.भारतातल्या अनेक जुन्या गावांचा इतिहास शोधून त्याचा अभ्यास करून भारत एका वेगळ्या स्वरुपात दाखवायचा अशी त्यांचा show ची concept होती. आणि त्या संदर्भातच एका गावाचा अभ्यास करायला सिंधुदुर्ग चा एका गावात ती जात होती.तिची research  team मागून कार ने येणार होती.पण हिला मात्र खास ट्रेनचाच प्रवास करायचा होता.मग राहवलं नाही म्हणून मग मी विचारलंच कि या आधी नेमकं काय कामं करायचीस? आणि पुढे काय करणारेस? तर म्हणाली "आधी एका director ला assist  करायचे documentries साठी...research वैगेरे..त्या आधी एका magazine साठी creative head म्हणून कामं केलं" मला ऐकताना इतका भन्नाट वाटत होतं.कितीतरी दिवसांनी काहीतरी नवीन मी ऐकत होते.रोज काहीतरी नवीन, किती मस्तय हे field असं वाटत होतं.रोज नवीन माणसांना भेटायचा,नवीन गोष्टींचा शोध,फिरत राहायचं..मस्तच!मी तिची करियर गाथा ऐकून हुरळून गेलेय हे तिचा लक्षात आल्यावर तिने तिची दर्दभरी कहाणी सुरु केली कि कसं या सगळ्यात struggle आहे,fix पैसे नाही, आज कामं आहे तर उद्या नाही.त्यात कधी कधी depression पण येतं ...पण स्वतःलाच धीर देऊन नवीन कामं शोधावं लागतं,पण आपण एखादं चांगलं कामं केलं असेल तर लोक त्या reference ने अगदी दोन वर्षाने कामं घेऊन पण येतात.मला राहवलं नाही आणि मी तिला विचारलंच " बाप रे इतका experience ? नेमकी कधीपासून कामे करतेयस तू?Don't  you want to settle down ? Don't you need a stability?" तर ती हसायला लागली आणि म्हणाली " मी माझा दोन पायांवर उभी आहे तितकी stability पुरेशी  आहे.मी गेली ९ वर्ष कामं करतेय . I am 32 now"मला धक्काच बसला ऐकून .तिला मी नोटीस केलं तेव्हापासून ती मला माझा वयाची वाटलेली.३२ तर मुळीच दिसत नाही,सोल्लिड maintain केलंय नाहीतर आमचा ऑफिस मधल्या तिशीचा मुली चाळीशी ओलांडलेल्या काकू दिसतात. लगेचच आईबाबान type प्रश्न विचारला "अजून लग्न नाही का झालं?" तर म्हणाली"लग्न केलं नाही, एक आवडलेला.3 वर्ष relationship मध्ये होतो पण पुढे जमलं नाही..आणि मग पुढे इतर कुणी आवडलाच नाही..बघू पुढे काय होतंय ते.. "मी मनात म्हटलं या beauty विथ brain ला कसं कुणी नाकारू शकतं.तिनेही लगेच माझाबद्दल विचारला, मी लगेच निखिल बद्दल सांगितल."माझा स्वतःचा ऑफिस सुरु करायचंय म्हणून थांबलोय थोडं लग्नासाठी.,,मला लग्न आधी थोडी stability  हवीय " तर ती हसायला लागली आणि म्हणाली "२५व्य वर्षी stable व्हायचंय? त्या stability मध्ये खुश राहता आलं तर अजून काय हवं म्हणा .."मला खरतर कळलंच नाही ती असं का म्हणाली ते.विषय बदलावा म्हणून मुद्दाम विचारला तिला "पुढचे काय प्लान्स?" तर ती म्हणाली "एक नाटक लिहिलंय,ते direct करायचा आहे..बघू हा travel  show  झाला कि ठरवेन " मी तिला म्हटल कि भीती नाही वाटत का अशा अधांतरी गोष्टींची तर ती म्हणाली " भीती कसली त्यात?आजचा दिवस जगतोय हेच किती महत्वाचा आहे , मग आजचा  दिवस पूर्णतः जगून घ्यायचा, पुढे जे व्हायचं ते होणारच.पुढचा विचार करून प्रश्नांची उत्तर तर मिळणार नाहीत...वेळ हेच सगळ्याच उत्तर आहे ..तुही तुझा  ऑफिसची, लग्नाची चिंता करणं सोड.ते जेव्हा व्हायचं तेव्हा होईलच...स्वतःवर आणि स्वतःचा कामावर विश्वास ठेव" मला एकदम हुरूप आला ते सगळं ऐकून..कधीतरी आपल्याला न ओळखणारी  माणसपण किती पटकन ओळखून जातात कि नेमकं आपल्याला काय हवंय ते...खरतर या ब्रेक पेक्षा मला काय हवं होतं ते हिने ओळखला होतं बहुदा..कदाचित हेच मला कळायला हा प्रवास घडत असेल आणि ही अनुष्का मला भेटली असेल..
आमचा गप्पांचा नादात जेवणाची वेळ झाली होती आम्ही दोघींनीही पुलाव order केलेला आणि मग नंतर तो खाता खाता मी तिला म्हटलं "आज खूप दिवसांनी इतका काही ऐकतेय, बोलतेय मी...नाहीतर नेहमीचा ठरलेल रुटीन आणि रविवारचा निखिल बरोबर फिरणं आणि माझ्या आणि निखिलचा गप्पा त्या काय तर लग्नात असं करू नि  तसं....असं कुणी इतका बोलायला भेटलाच नाही कधी...Thank you  अनुष्का" तर ती म्हणाली " नो need to thanks , मला पण छान कंपनी मिळाली कि तुझी..चांगलं वेळ गेला.." असाच बोलत बोलत आमचा पुलाव संपवला आणि तिने सीट खालून तिची sack  काढायला सुरवात  केली  मी म्हटला " अजून वेळ आहे" तर ती म्हणाली"No,its just half and hour far"मला कळलंच नाही काय react करावं, कारण मला अजून बोलायचा होतं तिचाशी..पण थांब कसं म्हणणार..तिचं Destination जे आहे तिथे ती जाणारच..bag पाठीला लाऊन माझाकडे हात पुढे करून म्हणाली " Nice to see you Ashwini. छान  वाटल भेटून , बोलून ..hope to see you in some other  train, other route...or somewhere in Bombay." मीही लगेच म्हटल " yes , Bombay मध्ये भेटूच" ती बाय करून पुढे गेली..तिचं स्टेशन आलं होतं.गाडी थांबली..ती उतरली..माझा खिडकीकडे आली आणि म्हणाली "Stability means resistant to change , but change is constant....so Don't run to become a stable..run for happiness... " आणि आत्ता मला तिचं सगळं बोलणं खऱ्या अर्थाने कळलं होतं.

Wednesday, July 2, 2014

एका संधीचा शोधात...

एका विचित्र वळणावर आलेय मी , थांबताही येत नाही आणि वळून पाहताही येत नाही .सतत चालत रहावं लागतंय दिशाहीन, पाय फुटेल त्या रस्त्याला...एका संधीचा शोधात. खरतर किती अधांतरी आहे हे दिशाहीन चालणं....म्हणजे कदाचित सुख , आनंदाने भरलेला गुलदस्ता माझी वाट पाहतोय असं असेलही किंवा त्रास, दुख्ख यांच काट्यांनी गुंफलेला जाळ...कोणी पाहिलंय पुढे काय मांडून ठेवलंय.. आपण मात्र चालत राहायचं एका संधीचा शोधात..दिवसा बरं असतं, निदान प्रकाशात काही आशा , हुरूप तरी जन्माला येतात.रात्रीचा काळाकुट्ट अंधारात मात्र काहीच दिसत नाही ..जिथे फक्त डोळे गच्च बंद करून स्वप्न पहायची थोडीफार अपेक्षा करता येते...पण एका संधीचा शोधात माणसं मात्र अनेक भेटतात.नशिबाने चांगली माणसं मिळाली तर ते योग्य मार्ग तरी दाखवतात नाहीतर तसंही बाकीचे स्वतःच रस्ता चुकलेले असतात.आपला मात्र प्रामाणिक प्रयत्न चालू असतो ती एक संधी मिळवण्यासाठी पण लोकांची दुनियादारी पाहून मन आपलंही विचलित होतंच.पण त्या विचलित मनाला रोखायचा कि धावू द्यायचा ते मात्र आपल्यावर असतं.त्या एका संधीचा शोधात आपण मैलोंमैल चालतो तहानभूक विसरून ...एकटेच..खरतर विचार , माणूस, सावली असं हे त्रिकुट मात्र कायम एकत्र असतं .दिवसा रात्रीचा प्रकाशाप्रमाणे सावलीचा आकार बदलत असतो, प्रत्येक वाटेवर मिळणाऱ्या अनुभवांवरून विचार बदलतात आणि माणसाचा काय आहे...तोही बदलतोच की..चातक पक्षी जसा पावसाची वाट पाहतो तसं झालंय माझं, स्वतःला सिद्ध करायला एक संधी मिळावी म्हणून त्या चातकाप्रमाणे संधीची वाट पाहतेय मी. सावलीचं एक बरं असतं ती असते सतत बरोबर .पण मला एक कळत नाही की माझा या अशा निरर्थक शोधात का ती साथ देत असते माझी?काय मिळणारय  शेवटला?माझा बरोबर सावलीही विरूनच तर जाणाराय...पण मग जाणवला की हि सावली खरतर आपलाच दुसरं रूप असतं. आपल्या विचारांना मजबूत करण्यासाठी जसं आपल्याला दुसऱ्यांचा पाठिंब्याची गरज असते त्याप्रमाणे हि सावली आपल्याला पाठीबाच तर देत असते निमुटपणे , कसलंही आमिष दाखवता...ती मात्र  असते सतत सांगायला '"मी आहे तुझाबरोबर  चालत रहा'"...आणि विचारांचं म्हणाल तर ते काही आपली पाठ सोडत नाहीत.चांगले वाईट अशा सगळ्यांच विचारांमध्ये आपण आपल्याला कळण्याआधीच गुरफटून गेलेलो असतो...असंच चालता चालता एक दिवस ती संधी  मिळेलही कदाचित  पण नाहीच मिळाली तर निदान स्वतःला तरी या प्रवासात शोधता आलं हा आनंद नक्की मिळो इतकीच काय ती माफक अपेक्षा  ठेवते...आणि चालत राहते त्या एका संधीचा शोधात...

Wednesday, July 6, 2011

yes and BECAUSE :P

yes I did mistakes,because you are there to correct me
yes I danced freely ,because you are watching me with dimple on cheek
yes I love to prove myself,because you always find me wrong (in a good sense 'wrong' :P)
yes I love to  stare at you,because you are so shy to look at my eyes..(.sometimes.. :P)
yes I eat a lot in front of you because I love your words "kiti bhukad ahes tu" :D:D
yes I do nautanki when u returned  home after our meeting
because I love your message "will meet you soon "
yes I love to cry because you are there to wipe my tears
yes I enjoyed your company because I find happiness in our talks
yes I love to smile on your jokes not because they are great(farach pakau astat:P),
just because u try to keep my mood good
yes I laughed loudly,because you are there to tell me "dear we are in public"(ooppss :P)
yes I do listen your all instructions because you always think good for me
yes I troubled you sometimes because I love to say "sorry"
yes I LOVE you a lot Because You also love me more than I do!:)


one more :P
yes I do 'haircut' because I love to get scolded by you as you don't like 'my short hair':(:P


p.s: I noe you dont hav 'dimple on ur cheek' bt its okay to think imaginary :P

Thursday, June 9, 2011

एका अनुभवावरून ......


दोन दिवसापुर्वीचा महाराष्ट्र Times ला front page ला एक फोटो आलेला 'फ्लाय ओवर चा राजा '.फ्लाय ओवर  चा फारच सुंदर  दर्शन घडला त्या फोटोमुळे .अंधाऱ्या रात्रीत त्या फ्लाय ओवर वरचे झगमगणारे दिवे फारच सुंदर दिसत होते.जग पुढे चाललाय आणि मुंबई सुद्ध्या पुढे  सरकण्यात मागे पडत  नाहीये..ठाणे ,मुंबई,नवी मुंबई एकूणच विकासाचा दिशेने सरसावाताय्त .वर्तमान पत्रातून नाहीतर TV द्वारे आपल्याला अशा प्रगतीचा बातम्या कळतच असतात.छान वाटत कि चला आपल्याकडेही लोक विकासासाठी प्रयत्न करतायत.पण काल एका कामानिम्मित्त जव्हार तालुक्यातील(जव्हार पासून साधारण १८ कम लांब ) 'आयरे ' या गावी गेलेले.
निसर्गाचा सानिध्यात असलेला अत्यंत सुंदर वातावरण असलेला हे गाव.या गावात ५ पाडे आहेत.प्रत्येक पाड्यात ३०-५० घरे contours वर वसलेली हि छोटी घरे लांबून पाहायला फारच छान दिसत होती .पण जसजसे या गावाचा जवळ गेले तेव्हा  जितका सुंदरपणा लांबून दिसला त्याहून अगदी उलटा त्या घरांमध्ये  पाहण्यात आले.कुपोषित बालके ,हाडकुल्या मुली ,माझाहून  अर्ध वय असलेल्या मुलींचा गळ्यात मंगळसूत्र .निसर्गाचा सानिध्यात असलेला हे सुंदर घर आतून मात्र पोखरलेल!गावात पहिले ते सातवी शिकवणारी एकच शाळा त्यात शिकवायला येणारे शिशक २ आणि शिकणारी मुलं मात्र २००.आता कितपत शाळा यांची चालू असेल याचा अंदाज आपण घेऊच शकतो.प्रत्येक घराचा वर सौर उर्जा देणारे panel .'प्रगती प्रतिष्ठान' या संस्थेचा मदतीने बसवले होते.पाहून  खरतर आनंद झालं..म्हटला वाहः अगदीच eco friendly .पण नंतर असा कळलं कि या padyanmadhalya माणसांनी प्रथमतः lights हि पाहिली ती या सौर ऊर्जेमुळे.२ वर्षापूर्वी हे panels बसवण्यात आले आणि त्यांना घरात LED  चे छोटे lights दिले गेले आहेत..त्या आधी इथे लोकांनी lights हा प्रकार पाहिलाच नव्हता .वर्षानुवर्षे इथली माणसे विजेशिवाय जगत आले आहेत.आजही यांचा घरात पंखा नाही किंवा इतर काही उपकरणे नाही कारण मुळात वीजच नाही.
          सरकार लाखोंचा खर्च करतंय मुंबई ला शांघाय करण्यात पण या गावातल्या पाड्यांचा काय??जिथे अजून साधी वीज पोचलेली नाही.इतर सोयीसुविधांची अपेक्षा करणं म्हणजे पापच म्हणा कि !

एकविसाव्या शतकात जगणारे आपण AC मध्ये  बसून काम करणारे जरा लोडशेडींग झालं कि लगेच शिव्या घालायला सुरु करतो.पण या गावाबद्दल काय bolaycha जिथे वर्षानुवर्षे लोक विजेशिवाय जगतायत.खरच जग किती मोठं आहे ना!खरतर अशा गावांबद्दल खूप ऐकलेला आणि वाचलेलं पण.परंतु आज जेव्हा प्रत्यक्षात अनुभवला तेव्हा खरतर आपण किती मागे आहोत याची जाणीव झाली.

Tuesday, November 16, 2010

asach kahisa suchalela....part2:P

मैत्री खरतर फार सुंदर शब्द आहे हा...जे लोक मैत्री जगतात त्यांना या शब्दाशिवाय सुंदर शब्द खरच सापडला नसेल.
मी आजपर्यंत अनेक मैत्रीचे किस्से ऐकलेत ,पाहिलेत.आणि मुळात म्हणजे मी स्वतः मैत्री जगलेय. कितीही बोलला तरी या मैत्री बद्दलचा प्रेम माझं काही कमी होणार नाही.Generally  मैत्री हि साधारण आपल्या वयाच्या अथवा आपल्याहून थोड्या मोठ्या किंवा छोट्या वयाचा माणसांशी आपण करतो.परंतु मी आज एक मैत्री पाहिली ती मैत्री आहे एक लग्न झालेल्या माणसाची आणि त्याचा वयाहून अर्ध वय असणाऱ्या मुलीची....खरतर वाचताना प्रथमतः विचित्र वाटत.साधारणतः मुळात पहिला प्रश्न येतो कि त्या माणसाचा लग्न झाला आहे तर मग त्याला आता एवढ्या कमी वयाचा मैत्रिणीची गरज  काय?बायको आहे कि त्याचा सुख-दुखं share करायला.आणि मग वाटू लागतं खरच त्या माणसाचा मनात मैत्रीचाच उद्देश आहे कि अजून इतर काही ....आपल्यामध्ये इतकी negativity असते ना कि आपण सरळ एखादी गोष्ट पाहूच शकत नाही.त्यातल्या शंभर चुका काढल्या नंतर आपण चांगले गुण पाहू लागतो.आणि खरतर त्यात आपली विशेष चूक आहे असा मला वाटत नाही.कारण काळच असा आहे कि आपल्या बाजूची व्यक्ती कधी आपल्याला काही करेल याचा नेम नाही.त्यामुळे असा संशय घेणं स्वाभाविक.
                परंतु खरच एका लग्न झालेल्या माणसात आणि त्याचा वयाहून अर्ध वय असलेल्या मुलीत नुसती निखळ मैत्रीही असू शकते...त्या व्यक्तीला एका मैत्रिणीची गरज असू शकते..एक काळ येतो कि मैत्रीण असणारी आपली बायको हि पूर्णतः' फक्त बायको' बनून जाते.तिचासाठी तिची मुले,परिवार,घर या गोष्टी महतावाच्या होतात.आणि या नादात ती आपला 'मैत्रीण'हे tag विसरून जाते.आणि मग कदाचित म्हणूनही त्या नवऱ्याला एका मैत्रिणीची गरज भासते.हि फक्त एक शक्यता आहे अशा अनेक गोष्टी त्या एका मैत्री मागे असू शकतात.गोष्टी आपण कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो ते महत्वाचे .मुळात पहिल्यांदा असा ऐकल्यावर आपण इतका सरळ विचार करताच नाही.नक्कीच त्या माणसाला त्या मुलीकडून काही गोष्टी हव्या असतील  or vice versa.आजच्या  काळात 'निखळ'हा शब्द हरवलाच आहे.माणूस साधा निखळ हास्य विसरलाय मग निखळ मैत्री तर फारच लांब...नाही का??....
नवरा बायको हे नाते जितक महत्वाचे त्याप्रमाणे मित्र आणि मैत्रीण हे नातेही महत्वाचेच.पण यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची तो म्हणजे 'विश्वास 'जर खरच आपल्याला समोरचा व्यक्तीवर विश्वास असेल ना तर एका आजी आणि तिचा नातवाचा वयाचा असलेल्या मुलाची देखील मैत्री होऊ शकते..पण 'प्रेम' हा शब्द जितका लांब असू शकतो मैत्री मध्ये तितकाच चांगला.माझामते  'मित्र म्हणून प्रेम आहे'या वाक्याला मुळात अर्थच नसतो मैत्री आणि प्रेम हे दोन शब्द प्रत्येक माणसाचा आयुष्यात असतातच.परंतु आपण कोणावर प्रेम करतो आणि कुणाशी मैत्री करतो हे ज्याचा त्याने ठरवला पाहिजे .एकतर प्रेम असतं नाहीतर मैत्री.या दोन्ही गोष्टी एकत्र आणणं म्हणजे स्वताच स्वताचा आयुष्यात गैरसमज निर्माण करणं....