दोन दिवसापुर्वीचा महाराष्ट्र Times ला front page ला एक फोटो आलेला 'फ्लाय ओवर चा राजा '.फ्लाय ओवर चा फारच सुंदर दर्शन घडला त्या फोटोमुळे .अंधाऱ्या रात्रीत त्या फ्लाय ओवर वरचे झगमगणारे दिवे फारच सुंदर दिसत होते.जग पुढे चाललाय आणि मुंबई सुद्ध्या पुढे सरकण्यात मागे पडत नाहीये..ठाणे ,मुंबई,नवी मुंबई एकूणच विकासाचा दिशेने सरसावाताय्त .वर्तमान पत्रातून नाहीतर TV द्वारे आपल्याला अशा प्रगतीचा बातम्या कळतच असतात.छान वाटत कि चला आपल्याकडेही लोक विकासासाठी प्रयत्न करतायत.पण काल एका कामानिम्मित्त जव्हार तालुक्यातील(जव्हार पासून साधारण १८ कम लांब ) 'आयरे ' या गावी गेलेले.
निसर्गाचा सानिध्यात असलेला अत्यंत सुंदर वातावरण असलेला हे गाव.या गावात ५ पाडे आहेत.प्रत्येक पाड्यात ३०-५० घरे contours वर वसलेली हि छोटी घरे लांबून पाहायला फारच छान दिसत होती .पण जसजसे या गावाचा जवळ गेले तेव्हा जितका सुंदरपणा लांबून दिसला त्याहून अगदी उलटा त्या घरांमध्ये पाहण्यात आले.कुपोषित बालके ,हाडकुल्या मुली ,माझाहून अर्ध वय असलेल्या मुलींचा गळ्यात मंगळसूत्र .निसर्गाचा सानिध्यात असलेला हे सुंदर घर आतून मात्र पोखरलेल!गावात पहिले ते सातवी शिकवणारी एकच शाळा त्यात शिकवायला येणारे शिशक २ आणि शिकणारी मुलं मात्र २००.आता कितपत शाळा यांची चालू असेल याचा अंदाज आपण घेऊच शकतो.प्रत्येक घराचा वर सौर उर्जा देणारे panel .'प्रगती प्रतिष्ठान' या संस्थेचा मदतीने बसवले होते.पाहून खरतर आनंद झालं..म्हटला वाहः अगदीच eco friendly .पण नंतर असा कळलं कि या padyanmadhalya माणसांनी प्रथमतः lights हि पाहिली ती या सौर ऊर्जेमुळे.२ वर्षापूर्वी हे panels बसवण्यात आले आणि त्यांना घरात LED चे छोटे lights दिले गेले आहेत..त्या आधी इथे लोकांनी lights हा प्रकार पाहिलाच नव्हता .वर्षानुवर्षे इथली माणसे विजेशिवाय जगत आले आहेत.आजही यांचा घरात पंखा नाही किंवा इतर काही उपकरणे नाही कारण मुळात वीजच नाही.
सरकार लाखोंचा खर्च करतंय मुंबई ला शांघाय करण्यात पण या गावातल्या पाड्यांचा काय??जिथे अजून साधी वीज पोचलेली नाही.इतर सोयीसुविधांची अपेक्षा करणं म्हणजे पापच म्हणा कि !
एकविसाव्या शतकात जगणारे आपण AC मध्ये बसून काम करणारे जरा लोडशेडींग झालं कि लगेच शिव्या घालायला सुरु करतो.पण या गावाबद्दल काय bolaycha जिथे वर्षानुवर्षे लोक विजेशिवाय जगतायत.खरच जग किती मोठं आहे ना!खरतर अशा गावांबद्दल खूप ऐकलेला आणि वाचलेलं पण.परंतु आज जेव्हा प्रत्यक्षात अनुभवला तेव्हा खरतर आपण किती मागे आहोत याची जाणीव झाली.