Saturday, February 20, 2016

सगळं काही..

उगाच उथळ सगळं काही.. 
बेभरव्श्याचं निरर्थक सगळं काही..
परवाचा वाढदिवस आणि कालचा पगार 
हातात स्वप्न आणि एक आळशी दुपार..
त्याचा एक फोन माझे चार इमेल्स 
प्रेमाचा एक त्रिकोण आणि बाकी सगळं गोल
कामाचा व्याप आणि व्यापात मी ...
माझात तू आणि तुझात?
पुन्हा तेच..उगाच उथळ सगळं काही..
बेभरव्श्याचं निरर्थक सगळं काही..
-अक्षता

4 comments: