ऑफिसची कामे , वर्क प्रेशर , मिटींग्स याचा अत्यंत कंटाळा आलेला .दिवसरात्र डोक्यात ऑफिस आणि फ्युचर हेच चालू असतं. स्वतःची Ca ची practice सुरु करायचीय तीही पुढचा दोन वर्षात...कसा काय जमून येणारय हेच सतत डोक्यात चालू असतं .त्यातून आईबाबांनी आणि निखिल चा आईबाबांनी २०१६ साल निश्चित केलय आमचा लग्नासाठी .तशी निखिल ला घाई नाही लग्नाची पण आता २०१४ चालूय आणि पुढल्या दोन वर्षात लग्नाआधी मला माझं ऑफिस सुरु करायचंय.सगळा गोंधळच आहे नुसता मनात.या सगळ्यातून जरा ब्रेक मिळावा म्हणून निखिलनेच सुचवला कि गावी जावून ये कोकणात ४ दिवसासाठी ..बरं वाटेल छान पावसाळी वातावरण आहे तर फ्रेश होशील....कोकण दर्शनाची सुरवात खास प्रवासापासूनच सुरु करावी म्हणून रात्रीचा प्रवास ऐवजी दिवसाचा प्रवास निवडला. आणि सकाळचा ट्रेनची तात्काळ मध्ये तिकीट काढून मोकळी झाले.
सकाळी सकाळी स्टेशनवर मस्त वाफाळता चहा घेऊन दादर- सावंतवाडी अशा प्रवासाला सुरवात केली.नशिबाने माझी विंडो सीट होती. विंडो सीट आणि जरा बरे सहप्रवाशी इतकी काय ती माझी माफक अपेक्षा असते कोणत्याही प्रवासाकडून.मग काय....मला नाही बुवा जमत प्रवासात पुस्तक वाचायला नाहीतर ढिम्मपणे बसायला.प्रवासात कसा चार नवीन प्रवासी भेटतात त्यांचाशी बोलावं, चार गोष्टी जाणून घ्याव्या.गप्पिष्ट असा माझा स्वभाव प्रवासात देखील शांत होत नाही.माझा समोरची विंडो सीट खरतर रिकामी होती पण बाकीचा चारही जागांवर सत्तरीतले आजी आजोबा बसलेले होते..खरतर माझा आजी आजोबा ग्रुप बरोबर पण जमत पण हे चौघे मात्र 'चायमे पानी जादा आणि शक्कर कम है फिरभी कैसा १० रुपया चाय का ' अशा चहावाल्याकडे सकाळी सकाळी कटकट करणाऱ्या कॅटेगरीतले होते.मनातल्या मनात म्हटला हा प्रवास अगदीच किरकिऱ्या लोकांबरोबर होणार असा दिसतंय एकूणच.पण तरी निदान समोरचा सीट वर जरा देखणा मुलगा आला तर बरं होईल...म्हणजे निखिल तसा देखणाच आहे आणि लग्न पण फिक्स आहे आमचं पण तितकंच जरा नेत्रसुख प्रवासभर ;) पुढचं स्टेशन म्हणता म्हणता आलं पण आणि माझी नजर इकडे तिकडे पाहत होती कि नक्की कोण समोर येवून बसतंय..तितक्यात एक मुलगी सीट शोधत आली आणि समोरचा सीटवर येवून बसली .ट्रेकला नेतात तशी sack होती पाठीला .ती पाहूनच मनात म्हटलं नक्कीच गोव्याला फिरायला चालली असणार ही.साधारण माझाच वयाची दिसत होती चोव्वीस पंचविशीची...लूज टी शर्ट आणि खाली पायजमा ,गळ्यात कलरफुल स्ट्रोल, हातात मोठ्ठ घड्याळ आणि पायात शूज ...थोडी विचित्र वाटावी अशी fashion होती खरी पण एकूण personality मात्र स्मार्ट होती. sack सीट खाली टाकून ती माझा समोर बसली...तितक्यात एक चहावाला आला.त्याचाकडून गरम गरम चहा घेऊन खिडकीबाहेर टक लावून पाहत बसली.असं वाटत होता काहीतरी स्वप्न पाहतेय उघड्या डोळ्यांनी...डोळ्यात कमालीचा आत्मविश्वास दिसत होता..हुशार आणि कमालीची उत्साही अशी वाटत होती ती एकूणच मला.मी तिचाकडे पाहतेय हे तिचा लक्षात आल्यावर मी लगेच दुसरीकडे पाहायला लागले तर स्वताहून तिने shake hand करायला हात पुढे केला आणि म्हणाली '' Hi ! I am Anushka Iyyer " मीही लगेच हात पुढे करून म्हंटलं "Hi ! I am अश्विनी रेडकर "ती लगेचच म्हणाली "रेडकर? वॉव, मराठी ,मस्तच !" मस्त'च' शब्द ऐकून आश्चर्याने विचारला तिला "मराठी येतं?""हो , अर्थातच, मुंबईत राहायचा म्हणजे मराठी आलंच पाहिजे ना आणि मी theater चा खूप अभ्यास केलाय सो अनेक मराठी नाटकं पाहिलीयेत ,वाचलीयेत त्यामुळे जमतं बर्यापैकी मराठी बोलायला "खूप उत्साहाने ती म्हणाली.मी मनात म्हटलं बरंय नाहीतर प्रवासभर 'ohh yeah , why not ' असे इंग्रजी शब्द वापरावे लागले असते.ऑफिस मध्ये पण तेच असतं सतत तोंडात साखरे एवढं गोड इंग्लिश....मी लगेच विषय वाढवण्यासाठी म्हटलं "कमालच आहे तुझी,मराठी नाटकांचा अभ्यास वैगेरे तेही south Indian असताना देखील ?""Tamilian , I am Tamilian "मला लगेच वाटला तेच ना म्हणजे ..पण मग म्हटलं जाऊ दे.असतो एकेकाला मातृभाषेचा अभिमान...खरतर मीच आधी विचारायला हवं होतं कि Iyyer म्हणजे नेमके कोण..पण माझं अज्ञान काय वाचणार तिचासमोर..मग तिनेच विचारला कि तू काय करतेस? मी सांगितल अमुक अमुक कंपनी मध्ये Ca आहे. Ca म्हटल्यावर तिचा थोडा चेहरा पडला ..मला कळेचना काय झालं म्हणून मी तिला विचारल "anything wrong ?" तर ती म्हणाली " नाही , actually acoounts वैगेरे फार बोरिंग वाटतं मला" मी लगेच म्हटलं " तसं ते दिसतं फक्त ,पण मजा आहे त्यात पण....खरतर मलाही नाटक पाहायला फार आवडत, लहानपणी मी बालनाट्यात कामं पण केलीत "तिला एकदम कौतुक वाटला आणि आमचा गप्पा सुरु झाल्या.नाटक हा दोघींचाही जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे मला जाणवला कि हा प्रवास विचारांनी सुखमय होणार हे नक्की. तमिळ असून पण सखाराम बाईंडर , अश्रूंची झाली फुले, ती फुलराणी अशी अनेक नाटकं तिने पहिली होती ,ती मराठी नाटकांबद्दल भरभरून बोलत होती....मग आमचे विषय मराठी संस्कृती,खाद्यापादार्थांवर गेले...इतपत कि अगदी तिने पुरणपोळी ची recipe तिचा tab मध्ये लिहून घेतली...बाहेर दिसणारा हिरवागार निसर्ग आमचा प्रवास अजूनच सुंदर करत होता.खूप वर्षांनी एखादी मैत्रीण भेटावी असं वाटत होतं मला. मधेच पावसाची एखादी सर guest appearance देऊन जात होती.या सगळ्या गप्पांचा नादात मी विचारायलाच विसरले कि पोटापाण्यासाठी काय करते ही नेमकी?मी विचारल्यावर हसायला लागली आणि म्हणाली "आत्ता काय करते ते सांगू कि आधी काय करायचे ते कि पुढे काय करणार ते?"मला काही कळलंच नाही ..या तिन्ही काळात तिचं कामं कसं काय बदलू शकतं? माझा चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून ती स्वतःच म्हणाली "मी एक Travel show direct करतेय सध्या" मला ऐकून फारच interesting वाटलं, मी लगेचच तिला त्याबद्दल details विचारले.भारतातल्या अनेक जुन्या गावांचा इतिहास शोधून त्याचा अभ्यास करून भारत एका वेगळ्या स्वरुपात दाखवायचा अशी त्यांचा show ची concept होती. आणि त्या संदर्भातच एका गावाचा अभ्यास करायला सिंधुदुर्ग चा एका गावात ती जात होती.तिची research team मागून कार ने येणार होती.पण हिला मात्र खास ट्रेनचाच प्रवास करायचा होता.मग राहवलं नाही म्हणून मग मी विचारलंच कि या आधी नेमकं काय कामं करायचीस? आणि पुढे काय करणारेस? तर म्हणाली "आधी एका director ला assist करायचे documentries साठी...research वैगेरे..त्या आधी एका magazine साठी creative head म्हणून कामं केलं" मला ऐकताना इतका भन्नाट वाटत होतं.कितीतरी दिवसांनी काहीतरी नवीन मी ऐकत होते.रोज काहीतरी नवीन, किती मस्तय हे field असं वाटत होतं.रोज नवीन माणसांना भेटायचा,नवीन गोष्टींचा शोध,फिरत राहायचं..मस्तच!मी तिची करियर गाथा ऐकून हुरळून गेलेय हे तिचा लक्षात आल्यावर तिने तिची दर्दभरी कहाणी सुरु केली कि कसं या सगळ्यात struggle आहे,fix पैसे नाही, आज कामं आहे तर उद्या नाही.त्यात कधी कधी depression पण येतं ...पण स्वतःलाच धीर देऊन नवीन कामं शोधावं लागतं,पण आपण एखादं चांगलं कामं केलं असेल तर लोक त्या reference ने अगदी दोन वर्षाने कामं घेऊन पण येतात.मला राहवलं नाही आणि मी तिला विचारलंच " बाप रे इतका experience ? नेमकी कधीपासून कामे करतेयस तू?Don't you want to settle down ? Don't you need a stability?" तर ती हसायला लागली आणि म्हणाली " मी माझा दोन पायांवर उभी आहे तितकी stability पुरेशी आहे.मी गेली ९ वर्ष कामं करतेय . I am 32 now"मला धक्काच बसला ऐकून .तिला मी नोटीस केलं तेव्हापासून ती मला माझा वयाची वाटलेली.३२ तर मुळीच दिसत नाही,सोल्लिड maintain केलंय नाहीतर आमचा ऑफिस मधल्या तिशीचा मुली चाळीशी ओलांडलेल्या काकू दिसतात. लगेचच आईबाबान type प्रश्न विचारला "अजून लग्न नाही का झालं?" तर म्हणाली"लग्न केलं नाही, एक आवडलेला.3 वर्ष relationship मध्ये होतो पण पुढे जमलं नाही..आणि मग पुढे इतर कुणी आवडलाच नाही..बघू पुढे काय होतंय ते.. "मी मनात म्हटलं या beauty विथ brain ला कसं कुणी नाकारू शकतं.तिनेही लगेच माझाबद्दल विचारला, मी लगेच निखिल बद्दल सांगितल."माझा स्वतःचा ऑफिस सुरु करायचंय म्हणून थांबलोय थोडं लग्नासाठी.,,मला लग्न आधी थोडी stability हवीय " तर ती हसायला लागली आणि म्हणाली "२५व्य वर्षी stable व्हायचंय? त्या stability मध्ये खुश राहता आलं तर अजून काय हवं म्हणा .."मला खरतर कळलंच नाही ती असं का म्हणाली ते.विषय बदलावा म्हणून मुद्दाम विचारला तिला "पुढचे काय प्लान्स?" तर ती म्हणाली "एक नाटक लिहिलंय,ते direct करायचा आहे..बघू हा travel show झाला कि ठरवेन " मी तिला म्हटल कि भीती नाही वाटत का अशा अधांतरी गोष्टींची तर ती म्हणाली " भीती कसली त्यात?आजचा दिवस जगतोय हेच किती महत्वाचा आहे , मग आजचा दिवस पूर्णतः जगून घ्यायचा, पुढे जे व्हायचं ते होणारच.पुढचा विचार करून प्रश्नांची उत्तर तर मिळणार नाहीत...वेळ हेच सगळ्याच उत्तर आहे ..तुही तुझा ऑफिसची, लग्नाची चिंता करणं सोड.ते जेव्हा व्हायचं तेव्हा होईलच...स्वतःवर आणि स्वतःचा कामावर विश्वास ठेव" मला एकदम हुरूप आला ते सगळं ऐकून..कधीतरी आपल्याला न ओळखणारी माणसपण किती पटकन ओळखून जातात कि नेमकं आपल्याला काय हवंय ते...खरतर या ब्रेक पेक्षा मला काय हवं होतं ते हिने ओळखला होतं बहुदा..कदाचित हेच मला कळायला हा प्रवास घडत असेल आणि ही अनुष्का मला भेटली असेल..
आमचा गप्पांचा नादात जेवणाची वेळ झाली होती आम्ही दोघींनीही पुलाव order केलेला आणि मग नंतर तो खाता खाता मी तिला म्हटलं "आज खूप दिवसांनी इतका काही ऐकतेय, बोलतेय मी...नाहीतर नेहमीचा ठरलेल रुटीन आणि रविवारचा निखिल बरोबर फिरणं आणि माझ्या आणि निखिलचा गप्पा त्या काय तर लग्नात असं करू नि तसं....असं कुणी इतका बोलायला भेटलाच नाही कधी...Thank you अनुष्का" तर ती म्हणाली " नो need to thanks , मला पण छान कंपनी मिळाली कि तुझी..चांगलं वेळ गेला.." असाच बोलत बोलत आमचा पुलाव संपवला आणि तिने सीट खालून तिची sack काढायला सुरवात केली मी म्हटला " अजून वेळ आहे" तर ती म्हणाली"No,its just half and hour far"मला कळलंच नाही काय react करावं, कारण मला अजून बोलायचा होतं तिचाशी..पण थांब कसं म्हणणार..तिचं Destination जे आहे तिथे ती जाणारच..bag पाठीला लाऊन माझाकडे हात पुढे करून म्हणाली " Nice to see you Ashwini. छान वाटल भेटून , बोलून ..hope to see you in some other train, other route...or somewhere in Bombay." मीही लगेच म्हटल " yes , Bombay मध्ये भेटूच" ती बाय करून पुढे गेली..तिचं स्टेशन आलं होतं.गाडी थांबली..ती उतरली..माझा खिडकीकडे आली आणि म्हणाली "Stability means resistant to change , but change is constant....so Don't run to become a stable..run for happiness... " आणि आत्ता मला तिचं सगळं बोलणं खऱ्या अर्थाने कळलं होतं.