मी आजपर्यंत अनेक मैत्रीचे किस्से ऐकलेत ,पाहिलेत.आणि मुळात म्हणजे मी स्वतः मैत्री जगलेय. कितीही बोलला तरी या मैत्री बद्दलचा प्रेम माझं काही कमी होणार नाही.Generally मैत्री हि साधारण आपल्या वयाच्या अथवा आपल्याहून थोड्या मोठ्या किंवा छोट्या वयाचा माणसांशी आपण करतो.परंतु मी आज एक मैत्री पाहिली ती मैत्री आहे एक लग्न झालेल्या माणसाची आणि त्याचा वयाहून अर्ध वय असणाऱ्या मुलीची....खरतर वाचताना प्रथमतः विचित्र वाटत.साधारणतः मुळात पहिला प्रश्न येतो कि त्या माणसाचा लग्न झाला आहे तर मग त्याला आता एवढ्या कमी वयाचा मैत्रिणीची गरज काय?बायको आहे कि त्याचा सुख-दुखं share करायला.आणि मग वाटू लागतं खरच त्या माणसाचा मनात मैत्रीचाच उद्देश आहे कि अजून इतर काही ....आपल्यामध्ये इतकी negativity असते ना कि आपण सरळ एखादी गोष्ट पाहूच शकत नाही.त्यातल्या शंभर चुका काढल्या नंतर आपण चांगले गुण पाहू लागतो.आणि खरतर त्यात आपली विशेष चूक आहे असा मला वाटत नाही.कारण काळच असा आहे कि आपल्या बाजूची व्यक्ती कधी आपल्याला काही करेल याचा नेम नाही.त्यामुळे असा संशय घेणं स्वाभाविक.
परंतु खरच एका लग्न झालेल्या माणसात आणि त्याचा वयाहून अर्ध वय असलेल्या मुलीत नुसती निखळ मैत्रीही असू शकते...त्या व्यक्तीला एका मैत्रिणीची गरज असू शकते..एक काळ येतो कि मैत्रीण असणारी आपली बायको हि पूर्णतः' फक्त बायको' बनून जाते.तिचासाठी तिची मुले,परिवार,घर या गोष्टी महतावाच्या होतात.आणि या नादात ती आपला 'मैत्रीण'हे tag विसरून जाते.आणि मग कदाचित म्हणूनही त्या नवऱ्याला एका मैत्रिणीची गरज भासते.हि फक्त एक शक्यता आहे अशा अनेक गोष्टी त्या एका मैत्री मागे असू शकतात.गोष्टी आपण कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो ते महत्वाचे .मुळात पहिल्यांदा असा ऐकल्यावर आपण इतका सरळ विचार करताच नाही.नक्कीच त्या माणसाला त्या मुलीकडून काही गोष्टी हव्या असतील or vice versa.आजच्या काळात 'निखळ'हा शब्द हरवलाच आहे.माणूस साधा निखळ हास्य विसरलाय मग निखळ मैत्री तर फारच लांब...नाही का??....
नवरा बायको हे नाते जितक महत्वाचे त्याप्रमाणे मित्र आणि मैत्रीण हे नातेही महत्वाचेच.पण यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची तो म्हणजे 'विश्वास 'जर खरच आपल्याला समोरचा व्यक्तीवर विश्वास असेल ना तर एका आजी आणि तिचा नातवाचा वयाचा असलेल्या मुलाची देखील मैत्री होऊ शकते..पण 'प्रेम' हा शब्द जितका लांब असू शकतो मैत्री मध्ये तितकाच चांगला.माझामते 'मित्र म्हणून प्रेम आहे'या वाक्याला मुळात अर्थच नसतो मैत्री आणि प्रेम हे दोन शब्द प्रत्येक माणसाचा आयुष्यात असतातच.परंतु आपण कोणावर प्रेम करतो आणि कुणाशी मैत्री करतो हे ज्याचा त्याने ठरवला पाहिजे .एकतर प्रेम असतं नाहीतर मैत्री.या दोन्ही गोष्टी एकत्र आणणं म्हणजे स्वताच स्वताचा आयुष्यात गैरसमज निर्माण करणं....
very good thought akshata...!!!
ReplyDeletethnx sudeep :)
ReplyDelete